Circuit Bench 
कोल्हापूर

Gokul election : संस्था पात्र-अपात्र ठरवा, मगच निवडणूक घ्या..!

गोकुळचे संचालक शौमिका महाडिक यांची सर्किट बेंचमध्ये याचिका

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अवसायन प्रक्रियेतील 1200 दूध संस्था पात्र-अपात्र ठरविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच गोकुळच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करावी, अशी मागणी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली आहे. यासंदर्भातील याचिका त्यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल केली आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत मे 2026 मध्ये संपत आहे. त्यामुळे दुग्ध विभागाकडून गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. दरम्यान, मतदार यादीतील 1200 दूध संस्थांच्या अवसायन कारवाईचा मुद्दा न्यायालयात गेल्याने निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली. याबाबतची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उपनिबंधक दुग्ध यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत सहायक दुग्ध निबंधक कार्यालयास पत्र दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT