Gokul milk |  Pudhari File Photo
कोल्हापूर

Gokul Dairy | ‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना ११७ कोटींची दिवाळी भेट

म्हैस दुधाला प्रतिलिटर २.२५, तर गाय दुधाला १.२५ रुपये दर फरक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांना दिवाळीची आर्थिक गोड भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील म्हैस व गाय दुधाच्या अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केले आहेत. १९ ऑक्टोबर रोजी ही रक्कम जमा करण्यात आली.

प्रशासक प्रदीप मालगावे यांच्या सुचनेनुसार ,१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ‘गोकुळ’ला पुरवठा केलेल्या म्हैस दुधासाठी प्रतिलिटर सरासरी दोन रुपये २५ पैसे (३.८१ टक्के), तर गाय दुधासाठी एक रुपये २५ पैसे (३.५१ टक्के) दर फरक देण्यात आला आहे. याशिवाय दूध संस्थांना प्रतिलिटर सरासरी २० पैसे डिबेंचर खात्यावर जमा केले आहेत.

यामध्ये म्हैस दुधापोटी ६३ कोटी १२ लाख, तर गाय दुधापोटी ३९ कोटी १३ लाख रुपये देण्यात आले आहेत. दर फरकावरील व्याज आणि डिबेंचर व्याजाचाही यात समावेश आहे. या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील सुमारे आठ हजार दूध संस्थांमधील पाच लाख दूध उत्पादक सभासदांना लाभ होणार आहे. ११ टक्के लाभांशाची रक्कम वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अदा केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT