कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील भूपाल टॉवरच्या बेसमेंटला असलेल्या गोडावूनला शुक्रवारी दुपारी आग लागली. आगीत बॉक्सचे गठ्ठे, इलेक्ट्रिक साहित्यांसह रिकाम्या बाटल्यांचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय आहे. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
भूपाल टॉवरमध्ये असलेल्या हॉटेलचे गोडावून इमारतीच्या बेसमेंटला आहे. गोडावूनमध्ये बॉक्सचे गठ्ठे आणि रिकाम्या बाटल्या आहेत. गुरुवारी दुपारी आग लागल्याने गोडावूनच्या खिडकीतून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. पांडुरंग चव्हाण यांच्यासह नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिस आणि मनपा अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळात ताराराणी चौक आणि महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. गोडावूनला कुलूप असल्याने खिडकीतून पाण्याचा मारा करण्यात आला. गोडावूनचे कुलूप तोडून पाण्याचा मारा झाल्याने काही काळात आग आटोक्यात आली.