Goa Liquor Smuggling | प्रवासी बॅगेतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी  
कोल्हापूर

Goa Liquor Smuggling | प्रवासी बॅगेतून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी

चौघांना अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोवा बनावटीच्या मद्याची ट्रॅव्हल्समधून तस्करी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५२ हजार रुपये किमतीची दारू, मोबाईल, रोख रक्कम असा सुमारे लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना बॅगेत मद्य भरुन हे तरुण कोल्हापुरात घेऊन येत होते. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात ही कारवाई केली.

शामकुमार श्रीचंद्र मुलचंदाणी (वय ३५, रा. शांतीप्रकाशनगर, गांधीनगर), रामेश्वर मुरलीधर शिंदे (३६, कोयना कॉलनी, गांधीनगर), धुलारॉय देवकीरॉय (३७), रामरॉय मदनरॉय ( ३२, दोघे रा. चिंचवाड रोड, गांधीनगर, मूळ रा. झारखंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

जवानाचे घर फोडून २ लाखांचे दागिने लंपास

चंदगड : नागरदळे येथे भारतीय सैन्य दलाचे जवान रामदास भरमू पाटील यांचे घर बुधवारी दुपारी फोडून दोन चोरट्यांनी दोन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबतची फिर्याद पत्नी पूजा पाटील यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. रामदास आठ दिवसांपूर्वीच सुट्टी संपवून ड्युटीवर रूजू झाले होते. पूजा या माहेरी करेकुंडी येथे गेल्या होत्या. सासरे भरमू हे शेजारच्या घरी लहान मुलांना घेऊन गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी चोरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT