घरच्यांना दिले गुंगीचे औषध; मुलगी ७.५ लाखांचा ऐवज घेऊन पसार  file photo
कोल्हापूर

घरच्यांना दिले गुंगीचे औषध; मुलगी ७.५ लाखांचा ऐवज घेऊन पसार

पुढारी वृत्तसेवा

किणी : जेवणात गुंगीचे औषध घालून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा साडेसात लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद वडगाव पोलिस ठाण्यात दाखल झाली. याप्रकरणी ऐश्वर्या महेंद्र शिंदे (वय २१) व ऋषीकेश राजेश भोपळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे २३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेची फिर्याद महेंद्र बजरंग शिंदे यांनी दिली. २२ जुलैला रात्री घरातील सर्वजण जेवण करण्याआधी महेंद्र शिंदे यांची मुलगी ऐश्वर्या हिने घरातील जेवणात गुंगी आणणारे औषध कालविले. सर्वजण गाढ झोपी गेल्याचे पाहून घरातील पाच तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच तोळे सोन्याच्या पाटल्या, पाच तोळे सोन्याचे तोडे, रोख रक्कम एक लाख रुपये व एक लॅपटॉप असा सुमारे सात लाख सत्तावन्न हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेली. हा प्रकार २३ जुलैला उघडकीस आला. तिची शोधाशोध केली असता ती सापडली नाही. या घटनेत ऋषीकेश भोपळे याचाही सहभाग असल्याने आजअखेर शोध घेत अखेर त्यांच्या विरोधात वडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक विलास भोसले तपास करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT