कोल्हापूर

कोल्हापूर : कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिकेचा कान तुटला

दिनेश चोरगे

फुलेवाडी; पुढारी वृत्तसेवा : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील गंगाई लॉनचौकात भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात प्रगती अनिल चौगले (वय 4) ही बालिका गंभीर जखमी झाली. तिचा कान जवळपास तुटला आहे.

निकारगे अपार्टमेंटमध्ये राहणारी प्रगती ही गंगाई लॉन येथील दुकानात चॉकलेट आणायला गेली होती. घरी जाताना अचानक 4 ते 5 भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. घाबरून ती जमिनीवर पडली. या हल्ल्यात तिचा एक कान पूर्ण फाटला असून, चेहरा, मानेवर जखमा झाल्या आहेत. दरम्यान, प्रगतीने आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. प्रगतीवर उपचार करून घरी सोडण्यात आले असून, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT