Girl Dies After Dog Bite | दसऱ्याच्या दिवशी कुत्र्याचा चावा; तुळशी विवाहादिवशी बालिकेचा मृत्‍यू 
कोल्हापूर

Girl Dies After Dog Bite | दसऱ्याच्या दिवशी कुत्र्याचा चावा; तुळशी विवाहादिवशी बालिकेचा मृत्‍यू

बोरिवडेतील मुलीचा ‘रेबीज’सदृश आजाराने अंत

पुढारी वृत्तसेवा

बोरपाडळे : बोरिवडे (ता. पन्हाळा) येथील रेवती संतोष चौगले (वय ८) हिला दसऱ्याच्या दिवशी कुत्र्याने चावा घेतला. महिनाभरानंतर तिच्यात ‘रेबीज’सदृश लक्षणे दिसू लागल्याने नातेवाइकांनी तिला सीपीआरमध्‍ये दाखल केले. मात्र, उपचारांदरम्यान शनिवारी (दि. २१) पहाटे तुळशी विवाहाच्या दिवशी तिची प्राणज्योत मालवली.

महिनाभरापूर्वी पिसाळलेल्‍या भटक्‍या कुत्र्याने रेवतीचा चावा घेतला होता. महिनाभर तिच्‍यावर स्‍थानिक पातळीवर उपचार केले गेले. शुक्रवारी लक्षणे दिसल्याने तिला ‘सीपीआर’मध्‍ये दाखल केले. उपचारांदरम्यान तिची प्राणज्योत मालवली. रेवती दुसरीत शिकत होती. तिच्या दुर्दैवी निधनाने चौगले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेने बोरिवडे गाव सुन्‍न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT