कोल्हापूर

बाजार समितीच्या सभापती पदी घाटगे गटाच्या नाना कांबळेंना संधी?

पुढारी वृत्तसेवा

आशिष पाटील

गुडाळ : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची मुदत संपण्यापूर्वीच नाराजी नाट्यामुळे राजीनामा दिलेले ना. हसन मुश्रीफ यांचे कागल तालुक्यातील समर्थक सूर्यकांत पाटील यांच्या रिक्त जागी कागल तालुक्यातीलच माजी आमदार संजय घाटगे यांचे समर्थक नाना कांबळे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

रिक्त झालेल्या सभापती पदाच्या निवडीसाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक आज शुक्रवार (दि. 10) दुपारी 4 वाजता बाजार समितीच्या प्रधान कार्यालयात होत आहे. त्यापूर्वी जिल्हा बँकेत बाजार समितीतील आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊन नूतन सभापती पदावर शिक्कामोर्तब होईल. माजी सभापती सूर्यकांत पाटील यांच्या उर्वरित तीन महिने काळासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य नाना धर्मा कांबळे यांना संधी देऊन कागल चे हे पद विहित मुदतीसाठी कागल मध्येच ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

माजी आमदार संजयबाबा घाटगे भाजपाचे असले तरी ना. मुश्रीफ यांच्यासोबत त्यांचा दोस्ताना आहे. जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था मध्ये त्यांची आघाडी आहे. मध्यंतरी कागल नगरपालिका निवडणुकीत ना. मुश्रीफ यांनी समरजीतराजे घाटगे यांच्याशी युती करताना संजय बाबा घाटगे यांना काहीसे बाजूला ठेवल्याने घाटगे नाराज झाले होते. आता बाजार समितीत घाटगे यांचे कट्टर समर्थक नाना कांबळे यांना सभापती पदाची संधी देऊन ही नाराजी दूर करण्यात येत आहे. समरजीत घाटगे यांच्या समर्थकांस कागलचे नगराध्यक्ष पद मिळाल्यानंतर आता नाना कांबळे यांना बाजार समिती सभापती पद मिळाल्यास या निमित्ताने ना. मुश्रीफ यांच्या कडून भाजपाला कागल मध्ये दुसरे महत्त्वाचे पद मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT