कोल्हापूर महानगरपालिका  Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur property geo referencing | कोल्हापूर शहरातील सर्व मिळकतींचे ‘जिओ रेफरेन्सिंग’ होणार

राज्यातील पहिलीच महापालिका; हद्दीतील प्रत्येक मिळकतीचे नकाशे, प्रॉपर्टी कार्ड मिळणार

पुढारी वृत्तसेवा

अनिल देशमुख

कोल्हापूर : शहरातील सर्व मिळकतींचे जिओ रेफरेन्सिंग होणार आहे. जिओ रेफरेन्सिंग म्हणजे मिळकतींचे नकाशे अक्षांश-रेखांशांशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे या सर्व मिळकतींचे अक्षांश-रेखांशासह जोडलेले नकाशे तयार होणार आहेत. मिळकतींचे जिओ रेफरेन्सिंग करणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. यासाठी शहराचा ड्रोन सर्व्हे होणार आहे. यामुळे जुन्या प्रॉपर्टी कार्डधारकांसह शहरातील सर्वच मिळकतींचे नकाशे मिळणार आहेत.

भारतीय सर्व्हेक्षण संस्थेकडून हे सर्व्हेक्षण होणार आहे. याकरिता पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पाठपुराव्याने जिल्हा नियोजन समितीतून 71 लाख रुपये संस्थेला भरले आहेत. ड्रोन सर्व्हेसाठी संस्थेने ‘डीजीसीए’ परवानगी मागितली आहे.

सर्वांचे नकाशे होणार; भविष्यात मोजणीची गरज नाही

शहरातील यापूर्वी 60 हजारांवर मिळकतींचे प्रॉपर्टी कार्ड आहे. सर्वेक्षणानंतर आणखी 50 हजारांवर मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड मिळेल. यामुळे 1 लाख 10 हजार मिळकतींचे क्षेत्र अक्षांश-रेखांशाशी जोडल्याने हद्दी निश्चित होतील. प्रत्येक मिळकतीचे नकाशे मिळतील. यामुळे भविष्यात मोजणीची गरज भासणार नाही, कोणी मोजणी मागितली, तर काही वेळातच रोव्हरद्वारे हद्दी दाखवण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT