‘जेन झी’ (Pudhari File Photo)
कोल्हापूर

Digital Language : ‘जेन झी’ची नवी डिजिटल भाषा लोकप्रिय

सोशल मीडियामुळे झाले भन्‍नाट शॉर्टफॉर्म; तरुणांच्या संवादात वाढता वापर

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : ‘नो कॅप’, ‘रेड फ्लॅग’, ‘डिलुलू’, ‘आयवायकेवायके’, ‘घोस्टिंग’... हे शब्द ऐकून तुम्ही गोंधळात पडत असाल, तर काळजी करू नका. ही आहे जनरेशन झेड (जेन झी) ची नवी डिजिटल भाषा. रील्स, एक्स, टिकटॉक, स्नॅपचॅट आणि विविध गेमिंग प्लॅटफॉर्मच्या प्रभावामुळे हे स्लँग्स तरुणांच्या दैनंदिन संवादाचा भाग बनले आहेत. या शब्दांचा वापर इतका वाढला आहे की, त्यांचा अर्थ माहिती नसल्यास सोशल मीडियावरील अनेक पोस्ट, मीम्स आणि चर्चांचा संदर्भच समजणे कठीण होते. तज्ज्ञांच्या मते, ही भाषा केवळ संवादापुरती मर्यादित नसून, बदलत्या डिजिटल संस्कृतीची नवी ओळख बनत आहे.

‘जेन झी’च्या अनेक शब्दांचा मूळ अर्थ पूर्णपणे बदललेला दिसतो. उदाहरणार्थ, ‘एट’ किंवा ‘नो क्रम्ब्स लेफ्ट’ यांचा अन्‍नाशी काहीही संबंध नसून एखाद्याने उत्कृष्ट काम केल्याचे कौतुक करण्यासाठी ते वापरले जातात. ‘नो कॅप’ म्हणजे ‘मी खरंच बोलतोय’, तर ‘कॅप’ म्हणजे ‘खोटे बोलणे’. ‘आयवायकेवायके’ (इफ यू नो, यू नो) म्हणजे ‘ज्यांना माहिती आहे, त्यांनाच कळेल,’ असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे ‘डिलुलू’ म्हणजे ‘वास्तवापासून दूर असलेली कल्पना किंवा भ्रम’, तर ‘एरा’ हा शब्द व्यक्तीच्या आयुष्यातील एखाद्या नवीन टप्प्याचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT