बांबावडे: शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागात गव्यांची दहशत कायम आहे. आज शनिवार (दि.१७ जानेवारी) सकाळी शाळेस जाणार्या मुलांचा रस्ता गवा रेड्याने काही काळ अडवला होता. ही घटना शिराळे वारुण ते शितूर वारुण या या दोन गावादरम्यान घडली. सुदैवाने यात कोणताही अनूचित प्रकार घडला नाही. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या भागातील शेतकरी शिवाजी चिचोलकर या शेतक-यास गव्याने गंभीर जखमी केले होते.
या बाबत माहिती अशी की शिराळे वारुण येथील मुले शित्तूर वारूण या गावातील माध्यमिक शाळेस येतात अज सकाळी शनिवार असल्याने शाळा सकाळी होती त्यामुळे सकाळी सात वाजता मुले शाळेस जाताना अंब्यांचा हूडा या ठिकाणी डोगरातून एक गवा आचानक रस्त्यावर आला या वेळी तीन- चार मुले शाळेत जात होती साधारण पन्नस पावलावर गवा होता याच वेळी शेजारच्या शेतात काम करणा-या शेतक-याने मुलांना सावध केले त्यामुळे मुले जाग्यावरच थांबली त्यामुळे गवा काही काळ थांबला आणि शेतात निघून गेला त्यामुळे अन्य कोणताही अनुचित्र प्रकार घडला नाही.
तालुक्याच्या उत्तर भागा वन्य प्राण्यांचे मानवा वरील हल्ले हे नित्याचे झाले आहेत, या बाबत वनविभाग कोणतीही ठोस कारवाई करत नाही त्यायुळे वन विभागास कधी जाग येणार असा सवाल लोकांच्या तून विचारला जात आहे.