kolhapur | गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांची माहिती; शहरासह जिल्ह्यात रांगा झाल्या कमी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अमेरिका-इस्रालय आणि इराण यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेले तीन दिवस विस्कळीत झालेला गॅस सिलिंडर पुरवठा शुक्रवारी काहीअंशी सुरळीत झाला. सिलिंडरसाठी तीन दिवस प्रचंड रांगा असलेल्या विविध भागातील गॅस एजन्सीज कार्यालयांसमोर शुक्रवारी मात्र काही ठिकाणी रांगा, काही ठिकाणी शुकशुकाट होता. दरम्यान, जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा साठा मागणीनुसार उपलब्ध होत आहे. त्यामुळे अफवांंवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.

युद्धामुळे गॅसटंचाईच्या धास्तीने नागरिक हवालदिल झाले आहेत. वितरण कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वादावादीसह हातघाईवर येण्याचे प्रकार घडले आहेत. शुक्रवारी मात्र चित्र वेगळे होते. काही एजन्सीजसमोर रांगा असल्या, तरी अनेक ठिकाणी गॅस सिलिंडर वितरण सुरळीत सुरू होते. काही ठिकाणी तर वितरण कर्मचारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते. जिल्हा प्रशासनाने घरपोच गॅस सिलिंडर देण्याचा आदेश दिल्याने अनेक एजन्सीज मालक थेट फलक लावून घरपोच गॅस सिलिंडर मिळेल; मात्र त्यासाठी ऑनलाईन बुकिंग आणि ओटीपी आवश्यक असल्याचे सांगत होते. अनेक ठिकाणी गॅस बुकिंगसाठी नागरिकांची तुरळक वर्दळ होती.

उपलब्ध सिलिंडर साठा

जिल्ह्यातील गॅस एजन्सीज उपलब्ध सिलिंडर साठा असा...

* गॅस एजन्सीज : 112

* 11 मार्च रोजी शिल्लक साठा : 65 हजार 599 सिलिंडर

* 12 मार्च रोजी आलेले सिलिंडर : 27 हजार 653

* 12 मार्च रोजी वितरित केलेले सिलिंडर : 26 हजार 853

* 12 मार्च रोजी शिल्लक साठा : 66 हजार 399 सिलिंडर

* जिल्ह्यास दररोज लागणारा साठा : 26 हजार 750 सिलिंडर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT