kolhapur Crime News | भाविकांच्या दागिन्यासह रोकडवर डल्ला मारणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या 
कोल्हापूर

kolhapur Crime News | भाविकांच्या दागिन्यासह रोकडवर डल्ला मारणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला बेड्या

६ लाखांचे दागिने हस्तगत : साथीदारांची नावे निष्पन्न

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सण, उत्सव काळात गावी जाणाऱ्या प्रवासी भाविकांच्या गळ्यातील दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारणाऱ्या बीड जिल्ह्यातील कुख्यात टोळीच्या म्होरक्याला कोल्हापूर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. प्रकाश विजय जाधव ( वय ४८, रा. औरंगपूर, ता. शिरूर कासार, बीड) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून ६ लाखांचे दागिने, रोकड हस्तगत करण्यात आली आहे. फरार साथीदाराची नावेही निष्पन्न झाली आहेत.

संशयित जाधव सराईत गुन्हेगार आहे. लातूर, बीडसह मराठवाडा, विदर्भात त्याच्यावर चोरी, दागिने, रोकड लंपास केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. टोळीतील आणखी तीन साथीदारांची नावे चौकशीत निष्पन्न झाली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

प्रवासी महिला सुशीला जाधव (रा. चंदगड, सध्या रा. मुंबई) यांचे कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक आवारात एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने मंगळसूत्र लंपास केले होते. राम विठ्ठल कांबळे (रा. चंदगड, सध्या रा. अहिल्यानगर) यांच्या खिशातील २५ हजारांची रोकड हातोहात लंपास करण्यात आली, तर प्रकाश गावडे (रा. पाचगाव, ता. करवीर, सध्या रा. सिंधुदुर्ग) याच्या गळ्यातील सोनसाखळीही चोरट्याने लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे, तांत्रिक कौशल्याच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषणने म्होरक्याचा छडा लावला. संशयित टोप, शिये फाटा परिसरात येणार असल्याचा सुगावा लागताच पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधवसह पथकाने सापळा रचून मुसक्या आवळल्या. चोरट्याकडून ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. टोळीतील साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच संशयितांना जेरबंद करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT