कोल्हापूर : घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेने इराणी खणीवर स्वयंचलित यंत्र बसविले.  Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : इराणी खणीतच उद्या गणेश विसर्जन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन गुरुवारी (दि. 12) विसर्जन होणार असल्याने त्याद़ृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी केली असून, पंचगंगा नदीघाटाकडे जाणारा रस्ता बॅरेकेडिंग लावून बंद केला आहे. विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी महापालिकेने इराणी खणीवर स्वयंचलित यंत्र बसविले असून, शहरात ठिकठिकाणी 200 विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे विसर्जन व्हावे, याद़ृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. इराणी खणीतच विसर्जनाची व्यवस्था केली आहे.

महापालिका प्रशासनाकडून इराणी खणीवर स्वयंचलित यंत्र बसविले आहे. या यंत्राची चाचणी आज महापालिकेच्या वतीने घेण्यात आली. या मार्गाकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांवर पॅचवर्कचे कामदेखील सुरू आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन जास्तीत जास्त चांगल्या पध्दतीने होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नदी, तलावात विसर्जन होणार नाही. यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस यांच्याकडून तसे संयुक्त प्रयत्न केले जात आहेत.

महापालिकेने मंगळवारी पंचगंगा नदीघाटाकडे जाणारा रस्ता बॅरेकेडिंग लावून बंद करण्याचे काम सुरू केले. गायकवाड पुतळ्यापासून ते शिवाजीपुलाकडे जाणार्‍या रस्त्याच्या एका बाजूला डबल बॅरेकेडिंग लावून रस्ता बंद केला आहे. गायकवाड पुतळ्याजवळ विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर इराणी खणीत मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असल्याने तेथे प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी बॅरेकेडिंग लावली जात आहेत. तर खणीवर विसर्जन सोपे होण्यासाठी स्वयंचलित यंत्र, तराफे यांची व्यवस्था केली आहे. इराणी खणीकडे जाणार्‍या सर्व रस्त्यांचे पॅचवर्कचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.

अशी आहे यंत्रणा

विसर्जन मिरवणूक तयारीसाठी कर्मचारी नियुक्त - 500

साफसफाईसाठी आरोग्यचे कर्मचारी - 1200

के.एम.टी. कडील कर्मचारी - 180

आरोग्य निरीक्षकांच्या टीम - 12

शिक्षण विभागाकडील कर्मचारी - 80

गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी कुंड - 160

इराणी खण येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र

दान केलेल्या गणेशमूर्ती संकलनासाठी - 145 टेम्पो

450 हमाल.

जे.सी.बी - 5

डंपर - 7

टॅक्टर - 4

पाण्याचे टँकर - 4

बुम - 2

साधे तराफे - 7

फ्लोटिंगचे

तराफे - 7

अ‍ॅम्बुलन्स - 5

निर्माल्य विलगीकरण करणे - 150 महिला कर्मचारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT