kolhapur | विसर्जन मिरवणुकीत दोन ट्रॉलींनाच परवानगी File Photo
कोल्हापूर

kolhapur | विसर्जन मिरवणुकीत दोन ट्रॉलींनाच परवानगी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रत्येक मंडळाच्या दोन ट्रॅक्टर व ट्रॉलींनाच परवानगी देण्यात येणार आहे. यापेक्षा जास्त ट्रॉली असणाऱ्या मंडळांना विसर्जन मार्गावर प्रवेश मिळणार नसल्याचे जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी स्पष्ट केले. वाहनसंख्या कमी झाल्यास जास्त मंडळांना मिरवणुकीमध्ये सहभागी होता येईल यासाठीच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यामध्ये ताराबाई रोडवरील १४ मंडळांचे चिठ्ठीद्वारे प्रवेशक्रम निश्चित केले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढल्या. मंडळांनी मिरवणुकीत १० बाय १२ फुटांचे स्ट्रक्चर जोडावे, ‘दोन बेस, दोन टॉप’लाच परवानगी असून प्रेशर मिड, लेसरला बंदी आहे. प्रत्येक मंडळाने दोन ट्रॉलींचा सहभाग ठेवणे बंधनकारक आहे. मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, ताराबाई रोडवरील मंडळांच्या स्ट्रक्चरसह ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी होणार आहे. दोनपेक्षा जास्त ट्रॉली असणाऱ्या मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नसेल. यंदा असलेल्या पहिल्या तीन मंडळांना पुढील वर्षी मिरवणुकीत शेवटी प्रवेश मिळणार आहे. पो.नि. किरण लोंढे यांच्यासह प्रशासनाने सोमवारी सायंकाळी विसर्जन मार्गाची पाहणी केली.

ताराबाई रोडवरील क्रम असा...

श्री साई मित्र मंडळ, हिंदवी स्पोर्टस्‌, चौपाटी मित्र मंडळ, रंकाळा तालीम, रंकाळा टॉवर, साकोलीचा राजा गणेश भक्त मंडळ, शिवाजी तालीम मंडळ, आयरेकर गल्ली, आझाद हिंद तरुण मंडळ ऊर्फ दयावान, वाघाची तालीम, महाराष्ट्र सेवा मंडळ, कै. उमेश कांदेकर युवा मंच, भोर तालीम, पॉप्युलर स्पोर्टस्‌ क्लब, गुरुवार पेठ, रंकाळावेस तालीम मंडळ, क्रांती बॉईज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT