कोल्‍हापूर : अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी शिवाजी तरुण मंडळाच्‍या महागणपतीची भाविकांच्‍या प्रचंड गर्दीत विसर्जन मिरवणूक काढण्‍यात आली.  (छाया : पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Mahaganpati Visarjan | ‘महागणपती’सह विविध मूर्तींचे दुसर्‍या दिवशी विसर्जन

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशी शनिवारी शिवाजी तरुण मंडळाच्‍या कोल्‍हापूरचा महागणती या गणेशमूर्तीसह शहरातील अनेक गणेशमूर्तींच्या सवाद्य मिरवणुका, भक्तिमय वातावरणात निघाल्या ‘गणपती बाप्‍पा मोरया’च्‍या गजरात त्यांना भावपूर्ण निरोप देण्‍यात आला. मिरवणूक मार्गावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. २१ फुटी महागणपतीच्‍या विसर्जनसाठी सुरवातीपासून क्रशर खणीपर्यंत भाविकांची रांग लागली होती.

गेले दहा ते बारा दिवस संपूर्ण शहरासह घरोघरी उत्‍साही वातावरणात विराजमान झालेल्‍या गणेशमूर्तींची शुक्रवारी अनंत चतुर्दशीदिवशी विसर्जन करण्‍यात आले. अनेक लहान मोठ्या मंडळांनी शनिवारी गणेशमूर्ती विसर्जन केले. सकाळपासून शहरातील विविध भागांतील लहान मोठ्या मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्‍या गजरात मिरवणुकांना सुरुवात केली. हालगी घुमकं कयचाळ, ढोल-ताशा आदींसह अन्‍य विविध वाद्यांच्‍या दणदणाटात मिरवणुका निघाल्‍या. शहरातील विविध भागातून सवाद्य मिरवणुका निघाल्‍याने वातावरण भक्तिमय बनले होते.

जुना बुधवार तालीम मंडळाच्‍या गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीस सकाळीच सुरुवात झाली. जुना बुधवार सीपीआर चौकातून मिरवणूक विविध मार्गांनी रंकाळा खणीकडे रवाना झाली. मिवरणुकीत मंडळाच्‍या कार्यकर्त्यांसह भाविक मोठ्या संख्‍येने सहभागी झाले होते. सायंकाळी ५ वाजता शिवाजी चौकातील शिवाजी तरुण मंडळाच्‍या कोल्‍हापूरचा महाराजा या गणेशमूर्तीची मिरवणूक सुरू झाली. ढोल-ताशा भगव्‍या रंगाच्‍या साड्या परिधान केलेल्‍या शेकडो महिला मिरवणुकीत सहभागी झाल्‍या होत्‍या. मूर्तीस अखेरचा निरोप देण्‍यासाठी मिरवणूक मार्गावर दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती. २१ फुटी गणेशमूर्तीच्‍या मिरवणुकीने मिरवणूक मार्गवर वारंवार वाहतूक कोंडी झाली. याबरोबरच कसबा बावडा येथील बहुतांश तरुण मंडळाच्‍या गणेशमूर्ती रंकाळा खणीत विसर्जनासाठी आणल्‍या होत्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT