इचलकरंजी : येथील शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली एका इमारतीत जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 2.35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
पांडुरंग बाबुराव कांबळे (वय 53, रा. सुतार मळा), रफिक मलिक मिरजे (42, रा. कारंडे मळा), स्वप्निल तानाजी काळे (33, रा. नारायणनगर), संजय विनायक कुलकर्णी (53, रा. सम—ाट अशोकनगर), खंडू ज्ञानदेव वरुटे (32, रा. शाहू कॉलनी), आयुब हबीब अन्सारी (49, रा. हत्ती चौक), विश्वनाथ विलास लवटे (41, रा. लिगाडे मळा), रोहिदास रमेश शिंदे (31), विशाल किरण कांबळे (24, दोघे रा. टाकवडे वेस), संतोष विलास बाबर (49, रा. हत्ती चौक), मोहीन मेहबूब बैरागदार (28, रा. गावभाग), मॅनेजर प्रकाश सदाशिव भिसे (43, रा. कोल्हापूर) व चालक शाहनूर इसाक सावळगी (48, रा. हत्ती चौक) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत 10 हजार 900 रुपये, 1 लाख 60 हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली, 15 हजार किमतीचे 6 मोबाईल व 20 हजारांचे जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या बाबतची फिर्याद पोलिस अंमलदार अमित कदम यांनी दिली आहे.