गडहिंग्लजमध्ये महिलेची १० लाखांची फसवणूक करण्यात आली  File Photo
कोल्हापूर

Gadhinglaj News | गडहिंग्लजमध्ये महिलेची १० लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : तुम्ही इराणला पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्जसारखे पदार्थ असून आम्ही मुंबईच्या नार्कोटिक्स विभागातून बोलत आहे. तुमच्यावर तातडीने कारवाई करत आहोत, असे सांगून ऑनलाईन पद्धतीने डिजिटल नजरकैद करत दहा लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद गडहिंग्लज शहरातील संकल्पनगर येथील पूजा शिवाजी चव्हाण (वय २९) या महिलेने पोलिस ठाण्याकडे केली आहे.

३० सप्टेंबर रोजी या महिलेला एका मोबाईल क्रमांकावरून टेलिग्राम या ऑपवरून फोन आला होता. यामध्ये आम्ही मुंबई नार्कोटिक्स अधिकारी असून तुम्ही इराणला पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्जशी संबंधित वस्तू असून तुम्ही बेकायदेशीर कृत्याशी संबंध असल्याची धमकी देत तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तातडीने पैसे पाठवा असे सांगून त्यांना ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अटक केली आहे, असे सांगितले.

यानंतर संबंधित इसमाने या महिलेकडून १० लाख ६८ हजार रुपये इतकी रक्कम ऑनलाईन घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने सायबर विभागाकडेही तक्रार केली होती. या महिलेने तीन वेगवेगळ्या खात्यातून पैसे संबंधित इसमाला दिले असून अशा पद्धतीने गडहिंग्लज पहिलाच फसवणुकीचा गुन्हा घडला असून पोलिस यामध्ये सखोल पद्धतीने तपास करत आहे. या महिलेला दिवसभर या अज्ञात व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने डिजिटल अटक केल्याने हा प्रकारही घडल्याने नेमके यामध्ये काय झाले आहे याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT