कोल्हापूर

गडहिंग्लज : भडगावला क्रशर खणीत बुडून आईसह मुलाचा मृत्यू

backup backup

गडहिंग्लज; पुढारी वृत्तसेवा : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथे क्रशर खणीमध्ये बुडून आईसह मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२) व मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.

सुजाता ही सामानगड रोडवर असलेल्या क्रशर खणीत कपडे धुण्यास गेली होती. तर रविवारची सुटी असल्याने तिच्यासोबत मुलगा मल्लिकार्जुन हा देखील सायकल घेऊन गेला होता. सुजाता धुणे धूत असताना मल्लिकार्जुन हा पाण्यात उतरून अंघोळ करत होता. खणीत पुढे पाण्याची पातळीवर खोल असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही व यातच तो गटांगळ्या खाऊन बुडू लागला. सुजाता ही त्याला वाचविण्यास धावली. मात्र दहा फुटांहून अधिक खोली असल्याने ते दोघेही बुडाले. दरम्यान ते परत न आल्याने शोध घेतला असता ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांनी घटनास्थळी जोरदार आक्रोश सुरु केला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT