कोल्हापूर

महागावच्या सचिनची पी.एस.आय पदी निवड | MPSC Success : PSI Result

backup backup

महागाव; पुढारी वृत्तसेवा : महागाव (ता.गडहिंग्लज) येथील सचिन बाळगोंडा पाटील याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेतून महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय पदी निवड झाली. वीज वितरण कंपनीतून सेवानिवृत्त कर्मचारी बाळगोंडा पाटील यांचा तो मुलगा असून त्याने अभियांत्रिकी मेकॅनिकल शाखेतून पदवी प्राप्त केली आहे.

महागावमधील श्री शिवाजी विद्यालयातून त्याने माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. गडहिंग्लजच्या साधना ज्युनिअर कॉलेजमधून विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक तर कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी कॉलेजमधून मॅकेनिकलची पदवी प्राप्त केली. २०२० मध्ये झालेल्या परीक्षेतून त्याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली असून त्याच्या या यशाबद्दल जल्लोषी मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला

SCROLL FOR NEXT