कोल्हापूर : वन विभागाच्या वतीने गडहिंग्लज परिसरात लाकडाच्या अवैध वाहतुकीवरकारवाई करून मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेण्यात आले.  
कोल्हापूर

Gadhinglaj forest department action | गडहिंग्लज वन विभागाच्या कारवाईत 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : वन विभागाच्या वनपरिमंडळ गडहिंग्लजच्या पथकाने गडहिंग्लज -नेसरी या मुख्य रस्त्यावर अवैधरीत्या इमारती लाकूड वाहतूक करणार्‍या वाहनांवर दोन स्वतंत्र कारवाया करून ट्रॅक्टर व इमारतीचे लाकूड असा 12 लाख 33 हजार 373 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हुनगीनाळ येथे ट्रॅक्टर (एमएच 09 एफक्यू 2179) थांबवून तपासणी केली असता 2.649 घन मीटर इमारती लाकूड आढळले. वाहन चालकाकडे कागदपत्रे नसल्यामुळे इम—ान बशीर संभोगकर (वय 36, गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. ट्रॅक्टर, ट्रॉली व इमारतीचे लाकूड असा एकूण 5 लाख 84 हजार 815.79 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसर्‍या कारवाईत मौजे नेसरी येथे ट्रॅक्टर (एमएच 09 एफजे 5349) थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 3.035 घनमीटर बिगर मनाई प्रजातीचे इमारतीठीचे लाकूड आढळून आले. वनरक्षक मासेवाडी यांनी गुन्हा नोंदविला. कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली व इमारतीचे लाकूड असा एकूण 6 लाख 48 हजार 558.19 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुशांत सदानंद देसाई (वय 29, रा. तळेवाडी, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहा. वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वनअधिकारी आजरा सचिन सावंत, वनपाल सागर पोवार, संदीप शिंदे, वनरक्षक प्रकाश शिंदे, दयानंद शिंदे, शीरशिंगे, तानाजी कळवीकट्टेकर, आनंदा कुंभार, किशोर नाईक आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT