कोल्हापूर

गणवेशासाठी साडेतीन कोटींचा निधी

Arun Patil

कागल, बा. ल. वंदूरकर : एक गणवेश खरेदीसाठी जिल्ह्यातील 1 लाख 15 हजार 748 विद्यार्थी-विद्यार्थिनींना 3 कोटी 47 लाख 24 हजार चारशे रुपयांचा निधी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.

दुसर्‍या गणवेशाची जबाबदारीही शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आली आहे. दुसर्‍या गणवेशाला मात्र निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. शिक्षण विभागामार्फत दरवर्षी सर्व मुली तसेच अनुसूचित जाती-जमाती व दारिद्य्र रेषेखालील मुलांना दोन गणवेश दिले जातात. एका गणवेशासाठी तीनशे रुपये याप्रमाणे प्रतिविद्यार्थी सहाशे रुपये शाळा व्यवस्थापन समितीकडे बिलानुसार वर्ग केले जातात. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती गणवेशाचा रंग ठरवून गणवेश वाटप करीत असते.

गणवेश शासन देणार की, शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करणार. याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता मात्र शाळा व्यवस्थापन समितीला गणवेश घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दुसर्‍या गणवेशचा विषय अद्याप तरी अधांतरीच ठेवण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या गणवेशांमध्ये मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट तर मुलींना आकाशी रंगाचा शर्ट, गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा सलवार-कमीज हा गणवेश निश्चित करण्यात आला आहे. कागल तालुक्यातील 10 हजार 339 विद्यार्थी-विद्यार्थिनींना 31 लाख 1700 रुपये जमा झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT