Vaishnavi Hagawane case
कोल्हापूर : सध्या राज्यभर गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांच्याबाबत आता नवीन माहीती समोर येत आहे. १६ मे रोजी सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हीने आत्महत्या केली होती. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी असलेला हगवणे कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील दोघेही फरार झाले होत. याप्रकणात वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे सासू लता राजेंद्र हगवणे व नंणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली होती.
या पिता पुत्रांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर ) या दोघांना शुक्रवारी पहाटे स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली. आता या दोघे फरार काळात कुठे- कुठे वास्तव्यास होते याचा पोलिस तपास करत आहेत. यातून हगवणे पितापुत्र महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील कोगनाळी येथे वास्तव्यास असल्याचे पुढे आले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र व सुशील कोगनोळी येथे एका रिसॉर्टवर राहीले होते. आश्चर्याची बाब म्हणजे हे रिसार्ट कर्नाटकातील माजी आमदाराच्या पुत्राने हागवणे पिता पुत्राचे बुकिंग केले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजेंद्र हगवणे याची राजकीय वर्तुळात वट असल्याचे दिसून येते आहे. या प्रकरणी पोलिसांवर दबाव वाढल्यानंतर आता पोलिसांनी तपसाची चक्रे जोरात फिरवली आहेत.
दरम्यान त्यांना पुणे पोलिसांनी स्वारगेट येथून अटक केल्यानंतर शिवाजीनगर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यांना कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुणावली आहे. दुसरीकडे आरोपींना न्यायालयात आणत असताना भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोपींच्या वाहनांवर टोमॅटो फेकत जोरदार घोषणाबाजी केली.
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी शशांक हगवणे (23) ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणेची ती सून आहे. भुकूम (ता. मुळशी) येथे 16 मेरोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वैष्णवीने आत्महत्या केली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली आणि तेच वैष्णवीच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत अशी फिर्याद वैष्णवीचे वडील आनंद ऊर्फ अनिल साहेबराव कस्पटे (51, रा. कस्पटेवस्ती, वाकड) यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिली होती.