सावराई सडा : येथे जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना अस्वल व दोन पिल्ले पाहायला मिळाली. 
कोल्हापूर

kolhapur | सावराई सड्यावर अस्वलांचा मुक्त संचार

पुढारी वृत्तसेवा

नंदकुमार गुरव

राधानगरी : राधानगरी-दाजीपूर वन्यजीव अभयारण्यातील निसर्गरम्य सावराई सडा परिसरात सध्या अस्वलांचा मुक्त वावर असून, वन्यजीवप्रेमी व पर्यटकांसाठी ही पर्वणी ठरत आहे. सकाळ आणि सायंकाळी अस्वलांची हालचाल अधिक दिसत आहे.

सह्याद्रीच्या घनदाट जंगलांनी वेढलेल्या या भागात अस्वले अन्‍नाच्या शोधात आणि नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे संचार करत आहेत. राधानगरी येथील सर्वज्ञ केरकर, प्रथमेश केरकर व बंडा चौगले हे दाजीपूर जंगल सफारीला गेले असता त्यांना सावराई सड्यावर हे सुंदर दृश्य दिसले. सावराई सडा हे दाजीपूर अभयारण्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून, येथे वन्यजीव विभागाने पाणवठ्याची व्यवस्था केल्यामुळे विविध वन्यप्राण्यांचे दर्शन घडते.

वन विभागाने वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे, कोणताही आवाज अथवा गोंधळ न घालण्याचे व वन्यजीवांना खाद्यपदार्थ न देण्याचे आवाहन केले आहे. वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर म्‍हणाले, वन्यजीवांच्या सुरक्षिततेसह पर्यटकांनीही आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT