कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बालिंगा येथून सराईत दुचाकी चोरट्यास अटक केली. 
कोल्हापूर

Bikes Stolen case | वीटभट्टी कामगाराकडून चार मोटारसायकली जप्त

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : वीटभट्टीवर कामगार असलेल्या सराईत दुचाकी चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बालिंगा (ता. करवीर) येथून अटक केली. गोपीचंद नंदकुमार पाखरे (वय 34, रा. गंजीमाळ, रुकडी ता. हातकणंगले, सध्या रा. कोपार्डे, ता. करवीर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त केल्या.

या कारवाईतून जुना राजवाडा, शाहूपुरी, गोकुळ शिरगांव, कराड येथील गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश आले. सराईत मोटरसायकल चोरटा कोपार्डे येथील वीटभट्टीवर कामास आहे. तो चोरीची मोटरसायकल घेऊन बालिंगा येथील महालक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम समोर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रूपेश माने, विनोद कांबळे यांना मिळाली. त्यानुसार बालिंगा येथे सापळा लावून पाखरे याला ताब्यात घेतले. सराईत चोरट्याकडून चार गुन्हे उघड आले.

2024 मध्ये कराड शहर, 2025 मध्ये शाहूपुरी व जुना राजवाडा आणि 2026 मध्ये गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला आहे. पावसाळ्यात दुचाकींची चोरी पाखरे हा आठ महिने वीटभट्टीवर काम करायचा. पावसाळ्यात तो मोटरसायकलींची चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सराईत चोरट्यावर यापूर्वीही मोटरसायकल चोरीचा गुन्हा नोंद आहे. 2023 मध्ये चार मोटरसायकली चोरी प्रकरणी पाखरे याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT