kolhapur Crime News | खंजीर नाचवून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक  File Photo
कोल्हापूर

kolhapur Crime News | खंजीर नाचवून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

नागाव : तासगाव-संभापूर रोडवरील अव्हेन्यू लॉजिंगच्या पार्किंगमध्ये हातात लोखंडी खंजीर घेऊन नाचत दहशत माजविणाऱ्या चार युवकांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडील लोखंडी खंजीर जप्त केले असून, त्यांना वडगाव येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

गुरुवारी तासगाव-संभापूर रोडवरील अव्हेन्यू लॉजिंगच्या पार्किंग परिसरात चार तरुण आले होते. त्यांच्या हातात लोखंडी खंजीरसारखे हत्यार होते. हे हत्यार हवेत नाचवून ते परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत माजवत होते. हा प्रकार लक्षात येताच लॉजिंग येथील शिरीष राजाराम कोळी (रा. शिरोली पुलाची) यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या प्रेम दिलीप कांबळे (वय २१, रा. सावर्डे, ता. हातकणंगले), ओंकार विनायक पाटील (२१, रा. नागाव पलुस), स्वप्निल सदाशिव जाधव (वय २४, रा. अंकलखोप, ता. पलूस), कैलास संतोष वासुदेव (१९, रा. भिलवडी माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली) या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लोखंडी खंजीर हस्तगत केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरीष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT