कोल्हापूर

कोल्हापूर : जिल्हा परिषद माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर भाजपात

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने कार्यकर्त्यांचे जाळे वाढविण्यास गती दिली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकांचा भाजप प्रवेश निश्चित आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर हे आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना (ठाकरे) चंदगड विधानसभा संघटक आणि उपजिल्हाप्रमुख संग्रामसिंह हे विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आहेत. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असणारे कुपेकर यांनी चंदगड पंचायत समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले आहे. तर जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे. शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेतील फुटीनंतर कुपेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली. भाजप नेत्यांच्या दौर्‍यांत त्यांनी हजेरी लावून भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. कुपेकर आता शिवंबधन तोडून भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT