Video Parlour Gambling Case | व्हिडीओ पार्लर जुगारप्रकरणी माजी नगरसेवकाकडे आज होणार चौकशी File Photo
कोल्हापूर

Video Parlour Gambling Case | व्हिडीओ पार्लर जुगारप्रकरणी माजी नगरसेवकाकडे आज होणार चौकशी

पोलिस अधीक्षकांकडून दखल : व्हिडीओ पार्लर तपासणीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : व्हिडीओ पार्लरच्या नावाखाली जुगार अड्डा चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शिवाजी पेठ येथील ‘पवित्रा व्हिडीओ गेम्स पार्लर’चा मालक आणि माजी नगरसेवक अजिंक्य शिवाजीराव चव्हाण (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला सोमवारी राजवाडा पोलिस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चौकशीअंती त्याच्यावर पुढील कारवाई शक्य असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, व्हिडीओ पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या जुगारी अड्ड्याची पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गंभीर दखल घेतली आहे. व्हिडीओ मशिनमध्ये तांत्रिक बिघाड करून लोकांची फसवणूक होत असल्यास शहर, जिल्ह्यातील व्हिडीओ पार्लरची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी शहर, जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. येथील गंगावेस ते रंकाळा बसस्थानक रोडलगत बाबुजमाल पोस्ट ऑफिससमोरील पवित्रा व्हिडीओ गेम्स पार्लरवर राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढेसह पथकाने छापा टाकून मालक अजिंक्य चव्हाणसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT