कोल्‍हापूर : खासदार शाहू महाराज यांच्‍या हस्‍ते शाहू चरित्र ग्रंथ देऊन निवृत्त सरन्‍यायाधीश भूषण गवई यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी डावीकडून मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती, ॲड. इंद्रजित चव्‍हाण, मालोजीराजे छत्रपती, दै. ‘पुढारी’ चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, मुंबई हायकोर्टचे निवृत्त न्‍यायाधीश सुरेंद्र तावडे, ॲड. श्रीकृष्‍ण गणबावले, ॲड. संग्राम देसाई, ॲड. राजेंद्र चव्‍हाण आणि ऋतुराज इंगळे.  (छाया : पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Kolhapur News| माजी सरन्‍यायाधीश भूषण गवई यांचा खा. शाहू महाराजांनी केला सत्‍कार

न्‍यू पॅलेसमध्‍ये भूषण गवई यांची खा. शाहू महाराज, डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी विविध विषयांवर चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : देशाचे माजी सरन्‍यायाधीश भूषण गवई यांनी खासदार शाहू महाराज यांची न्‍यू पॅलेस या निवासस्‍थानी भेट दिली. यावेळी गवई यांचा खा. शाहू महाराज यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव उपस्‍थित होते.

माजी सरन्‍यायाधीश भूषण गवई रविवारी कोल्‍हापूर दौर्‍यावर आले होते. या दौर्‍यात गवई यांनी न्‍यू पॅलेस येथे भेट देऊन खा. शाहू महाराज आणि दै. ‘पुढारी’चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्‍याशी चर्चा केली.

यावेळी गवई यांनी खा. शाहू महाराज आणि दै. ‘पुढारी’चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्‍याशी विविध विषयांवर चर्चा केली. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनीही गवई यांचे स्‍वागत केले. खासदार शाहू महाराज यांनी राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, शाहू महाराज यांचे चरित्रग्रंथ, शाल, बुके देऊन गवई यांचा सत्‍कार केला. यावेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती उपस्‍थित होते.

यावेळी मुंबई उच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्‍यायाधीश सुरेंद्र तावडे, मुंबई उच्‍च न्‍यायालय कोल्‍हापूर सर्किट बेंच बार असोसिएशनचे कार्याध्‍यक्ष ॲड. श्रीकृष्‍ण गणबावले, ॲड. इंद्रजित चव्‍हाण, ॲड. संग्राम देसाई, ॲड. राजेंद्र चव्‍हाण उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT