कोल्हापूर : १) शिवाजी विद्यापीठात आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलताना माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग. २) यावेळी उपस्थित अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून देशाच्या सुरक्षेला बळ द्यावे

भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल जे. जे. सिंग : शिवाजी विद्यापीठात व्याख्यान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भारताला महासत्ता बनविण्यासाठी युवकांनी पारंपरिक वाट सोडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून राष्ट्रीय सुरक्षेत योगदान द्यावे, असे आवाहन भारताचे माजी लष्करप्रमुख व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे. जे. सिंग यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षातर्फे ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि युवकांची भूमिका’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. राजनीश कामत होते. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

आधुनिक युद्धाचे स्वरूप झपाट्याने बदलत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि माहिती तंत्रज्ञानाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे. भविष्यात सुरक्षेची जबाबदारी केवळ सैन्यदलांची नसून उद्योग, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदानही महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. एनडीए, सीडीएस, अग्निपथ योजना, अभियांत्रिकी क्षेत्रातील तांत्रिक प्रवेश, शॉर्ट सर्व्हिस कमिशन तसेच वैद्यकीय क्षेत्रातून सैन्यदलांत करिअर करता येते. महिलांसाठीही लष्कर, नौदल आणि हवाई दलात विविध संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सिद्धार्थ शिंदे यांनी संकल्पना मांडली. डॉ. सुभाष कोंबडे यांनी प्रास्ताविक केले. शामल पवार यांनी सूत्रसंचालन, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, अधिकारी आणि एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संरक्षण क्षेत्रात कोल्हापूरला संधी : कुलगुरू

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, संरक्षण क्षेत्रात संशोधन, नवोपक्रम आणि स्टार्टअप्ससाठी मोठ्या संधी निर्माण होत असून, कोल्हापूरमधील फाऊंड्री व अभियांत्रिकी उद्योगही या क्षेत्राचे महत्त्वाचे पुरवठादार बनत असल्याचे संरक्षण क्षेत्रात सैन्यदलांबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, वाणिज्य, कायदा आणि पत्रकारिता क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT