kolhapur | 12 वन गुन्ह्यांत 25 संशयित, सात वाहने, 8 मोबाईल जप्त Pudhari File Photo
कोल्हापूर

kolhapur | 12 वन गुन्ह्यांत 25 संशयित, सात वाहने, 8 मोबाईल जप्त

सहा महिन्यांत अवैध शिकार, वृक्षतोड, वाहतुकीबाबत वन विभागाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर वन विभागाने जुलै 2025 ते जानेवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत अवैध शिकारीच्या 12 वनगुन्ह्यात 25 संशयित आरोपी, 7 वाहने व 8 मोबाईल जप्त केले आहेत. जप्त केलेल्या 25 वाहनांचा लिलाव, अवैध वाहतुकीचे 58 वन गुन्हे नोंद केले असून यात 61 वाहनांवर कारवाई करून त्यातील 139 आरोपींकडून 5.58 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

380 वन्य प्राण्यांचा बचाव

24 तास जलद कृती दलात 36 आणि हत्ती हाकारा दलात 72 कर्मचारी सक्रिय. यांनी गवे, बिबटे, साळींदर, कोल्हे, सर्प व इतर अशा एकूण 380 वन्य प्राण्यांचा बचाव व आवश्यक औषधोपचार करून नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले आहे.

कारवाईत जप्त केलेले लाकूड

इमारती लाकूड 10.02 घ.मी. व जळाऊ लाकूड 789.235 घ.मी.

न्यायालयात दाखल गुन्हे

यापूर्वी 89 वन गुन्हे व अवैध वाहतूकीचे 5 वन गुन्हे न्यायालयात दाखल.

जप्त वाहने 25

मोटारसायकल 6, ओमनी कार 2, जीप 6, टेम्पो 2, ट्रॅक्टर 2, ट्रक 6, कार 1.

लिलावाद्वारे जमा महसूल

22.06 लाख

अवैध वृक्षतोड कारवाई

40 गुन्हे, इमारती माल 0.556 घ.मी. व जळाऊ माल 292.101 घ.मी. जप्त.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी

21 प्रकरणे 4 मृत, 10 गंभीर जखमी, 7 किरकोळ जखमी.

पीक नुकसान भरपाई

4 कोटी 96 लाख पशुहानीची 230 प्रकरणे

27.39 लाख व पीक नुकसानीच्या 9672 प्रकरणामध्ये 4 कोटी 96 लाख इतकी रक्कम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT