कोल्हापूर

कोल्हापूरात सकाळी धुक्याची दाट दुलई

मोहन कारंडे

कसबा बावडा; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील नागरिकांना आज (दि.४) वातावरणातील बदलाचा पुन्हा एकदा अनुभव आला. सकाळी आठ वाजेपर्यंत वातावरण थंड होते, सर्वत्र धुके पसरले होते. गेले काही दिवस सकाळी ११ वाजल्यानंतर वातावरणात उष्णता जाणवू लागली आहे. अशातच आज सकाळी धुक्याची दुलई पसरल्याने याचा परिणाम नागरी आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.

वातावरणातील बदलामुळे गेल्या आठवड्याभरात सकाळी वातावरण थंड असते. तर अकरा वाजल्यानंतर वातावरणात कमालीची उष्णता जाणवते. वातावरणातील या बदलामुळे नागरी आरोग्य बिघडत आहे. यातच कोरोनाचा व्हेरियंट आणि त्याचे रुग्ण काही प्रमाणात सापडत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. बदलत्या वातावरणामुळे नागरी आरोग्यावर परिणाम होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जण आता पुन्हा मास्कचा वापर करू लागले आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT