Flyover work continues in heavy rain at Kolhapur
महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : भर पावसात उड्डाणपुलाचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : पुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप-कासारवाडी फाट्यावर भर पावसात उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे कोल्हापूरच्या दिशेला पाठीमागे सुमारे तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

धुवाधार पावसात उड्डाणपुलाचे काम सुरू

कासारवाडी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम मागील काही दिवसापासून सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर धुवाधर पाऊस सुरू होता महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम धुवाधार पावसात सुरू होते. वाहणारे पाणी , पडणारा मुसळधार पाऊस यातच काँक्रिटीकरणाचे सुरू असलेले काम यामुळे वाहन चालक व नागरिक आश्चर्य व्यक्त करत होते. कासारवाडी फाटा येथून राज्यमार्ग ज्योतिबा पन्हाळ्याकडे जातो. त्यामुळे ज्योतिबा पुण्याकडून येणारी वाहने जवळच औद्योगिक वसाहतीतून सुटलेला कामगार वर्ग आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहने यांच्यामुळे सायंकाळी पाचच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती . सुमारे दोन ते तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. ज्योतिबा राज्य मार्गावरील सुमारे ५०० मीटर पर्यंत गुडघ्या एवढे पाणी असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करवी लागत होती. महामार्गावरून जाणाऱ्या रुग्णवाहिका व चालत जाणाऱ्या नागरिकांना देखील रस्ता मिळत नव्हता.

SCROLL FOR NEXT