kolhapur Crime News | दीड महिन्यात पाच घरफोड्या; दोघांना अटक  
कोल्हापूर

kolhapur Crime News | दीड महिन्यात पाच घरफोड्या; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दीड महिन्यात गोकुळ शिरगाव, कुरुंदवाड, पेठवडगाव परिसरात ५ ठिकाणी घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ७२ ग्रॅम सोने, ५३४ ग्रॅम चांदीचे अलंकार, दोन मोटारसायकली असा सुमारे बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संतोष गाळाप्पा मुंडरगी (वय २७) व संतोष बाजीराव पवार (२१, दोघे रा. टेंबलाईवाडी, उचगाव) अशी त्यांची नावे असून, हे दोघे रात्रीच्या वेळी बंद घरे फोडत होते.

शिंदे कॉलनी, कणेरी येथे १७ ऑगस्टला झालेल्या घरफोडीचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. टेंबलाईवाडी परिसरात या चोरीतील सोने विकण्यासाठी दोघे संशयित येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना मिळाली होती. यानुसार पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी या परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचे सोने, दुचाकी जप्त केली. या दोघांनी गोकुळ शिरगाव, कुरूंदवाड, गडहिंग्लज, पेठवडगाव परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र कोरवी, प्रदीप पाटील, सत्यजित तानुगडे, विशाल खराडे, संदीप सावंत, संतोष बरगे यांनी ही कारवाई केली.

आठ ठिकाणी घरफोडी

संशयित दुचाकीवरून रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात फिरत असताना बंद घर लक्ष करत होते. गेल्या दीड महिन्यात त्यांनी आठ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली; मात्र यापैकी तीन ठिकाणी चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT