Shivaji University | कुलगुरू पदासाठी पाच जणांनी दिल्या मुलाखती Pudhari Photo
कोल्हापूर

Shivaji University | कुलगुरू पदासाठी पाच जणांनी दिल्या मुलाखती

आज निर्णय होण्याची शक्यता : उत्सुकता शिगेला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा शोध आता संपला आहे. पात्र पाच अंतिम उमेदवारांच्या मुलाखती गुरुवारी मुंबईत झाल्या. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, नागपूर येथील डॉ. स्मिता देशमुख व पुणे विद्यापीठाचे डॉ. संजय ढोले यांनी मुलाखती दिल्या. कुलपती कार्यालयाकडून शुक्रवारी यातील एकाची निवड केली जाण्याची शक्यता आहे. नवीन कुलगुरू कोण होणार? याची शिक्षण क्षेत्रात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

तत्कालीन कुलगुरू डी. टी. शिर्के यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाल 6 ऑक्टोबर 2025 रोजी पूर्ण झाला. त्यानंतर कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे देण्यात आला. सध्या विद्यापीठाचे पूर्णवेळ कुलगुरुपद रिक्त आहे. कुलगुरू शोध समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत 115 जणांनी अर्ज दाखल केले. फेब—ुवारीत अर्जाची छाननी होऊन त्यातून निवड समितीने 28 उमेदवारांची नावे मुलाखतीसाठी पात्र ठरवली.

मुंबईत 3 व 4 एप्रिल रोजी त्यांच्या मुलाखती झाल्या. त्यानंतर कुलगुरू निवड शोध समितीने पात्र पाचजणांची नावे कुलपती कार्यालयाकडे सादर केली. त्यानुसार राज्यपाल तथा कुलपती विष्णुदेव वर्मा यांनी गुरुवारी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. प्रत्येक उमेदवारास सुमारे अर्धातास वेळ दिला गेला. मुलाखतीची प्रक्रिया झाल्यानंतर नवीन कुलगुरू निवडीची घोषणा होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप नाव जाहीर झालेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT