Armed Attack | पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर सशस्त्र हल्ला; ५ जणांना अटक File photo
कोल्हापूर

Armed Attack | पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर सशस्त्र हल्ला; ५ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून घरात घुसून बाप-लेकावर धारदार शस्त्रांसह दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या पाच हल्लेखोरांना राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. हल्ल्यात ओमकार हणमंत गाडीवडर (वय २२), वडिळ हणमंत गाडीवडर (रा. जागृतीनगर, राजारामपुरी कोल्हापूर) जखमी झाले.

संशयित प्रसाद राजाराम कलकुटगी, अनिकेत धोत्रे, आकाश मळगेकर (रा. दौलतनगर, राजारामपुरी), वैभव उमेश इंगवले (रा. डवरी वसाहत, कोल्हापूर), विकास संजय गाडीवडर (वय २१, रा. दौलतनगर, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी प्रसाद कलकुटगी, धोत्रे, मळगेकर यांच्याविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचे सांगण्‍यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT