Bone Marrow Transplant | राज्यातील पहिली सरकारी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा सीपीआरमध्ये  Pudhari File Photo
कोल्हापूर

Bone Marrow Transplant | राज्यातील पहिली सरकारी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ सुविधा सीपीआरमध्ये

महिनाभरात कार्यान्वित होणार : कॅन्सरग्रस्तांना मिळणार दिलासा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रक्ताच्या कॅन्सरशी झुंज देणार्‍या रुग्णांच्या डोळ्यांत आजपर्यंत भीती आणि पैशांच्या चिंतेचे सावट दिसत होते. पण आता त्या डोळ्यांत आशेचा किरण चमकू लागला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात (सीपीआर) महिनाभरात राज्यातील पहिले सरकारी ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ ही अत्याधुनिक सुविधा सुरू होणार आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य रुग्णांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

सीपीआरच्या कोयना इमारतीत उभारण्यात आलेला हा विशेष विभाग रक्ताच्या पेशींचा कॅन्सर, रक्तपेशी, तयार न होणे, लहान मुलांमधील कॅन्सर तसेच थॅलेसेमिया अशा गंभीर आजारांवर उपचारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या उपचारासाठी रुग्णांना मोठ्या शहरातील खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत होती. दहा ते पंधरा लाख रुपयांचा खर्च ऐकून अनेक कुटुंबांचे पायच लटपटत होते. काहींंनी घर-जमीन विकली, कर्ज काढले तर काहींना पैशाअभावी अर्ध्यावर उपचार थांबवावे लागले आहे.

सीपीआर येथील मेडिसिन विभागात दर महिन्याला आठ ते दहा ब्लड कॅन्सर रुग्ण उपचारासाठी येतात. आणि नव्याने तीन ते चार रुग्ण आढळतात. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या आणि आर्थिक अडचणी पाहता ही सुविधा काळाजी गरज होती. आता मात्र हीच सुविधा सीपीआर मोफत व माफक दरात उपलब्ध होणार असल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या खांद्यावरील आर्थिक ओझे हलके होणार आहे. कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सीमेलगतच्या गावातील कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायी ठरणार आहे.

आशेचा किरण

कॅन्सरची वाढती समस्या गंभीर आव्हान ठरत असताना सीपीआरमध्ये सुरू होणारी बोन मॅरो ट्रान्सप्लांट सुविधा म्हणजे आशेचा किरण आहे.

ही केवळ वैद्यकीय सेवा नसून सर्वसामान्यांच्या आयुष्यात पुन्हा आनंदाचा सूर्य उगवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT