पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील महालक्ष्मी एक्सप्रेसला आग लागल्याची घटना गुरूवारी (दि.१३) रात्री ९ च्या सुमारास उघडकीस आली. वातानुकूलित बोगीच्या खाली आग लागल्याचे निदर्शनास येताच रुकडी येथील पंचगंगा नदीजवळ रेल्वे थांबवण्यात आली. त्यानंतर आग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.