कोल्हापूर

जयसिंगपूरमध्ये ७ दुकानांना भीषण आग, ७० लाखाचे नुकसान

निलेश पोतदार

जयसिंगपूर : संतोष बामणे जयसिंगपूर जि.कोल्हापूर येथील शिरोळ-वाडी रोड असलेल्या दुकानांना शार्टशर्किटने भीषण आग लागून 7 दुकाने जळून खाक झाली. ही घटना (सोमवार) मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास घटली. यात सुमारे 70 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल व फर्निचर यासह साहित्य जळून खाक झाले आहे. रात्री 2 वाजल्‍यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमल दलाचे प्रयत्‍न सुरू होते. यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.

याबाबात अधिक महिती अशी की, येथील शिरोळ वाडी रोडवर दुकान लाईन आहे. (सोमवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास शार्टशर्किटने आग लागली. आगीची घटना नागरीकांना लक्षात आल्यानंतर नागरीकांनी पालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. ही आग लगत-लगत असलेल्या 7 दुकानांना लागल्याने लवकर आटोक्यात येवू शकली नाही. तसेच घटनास्थळी असलेल्या नागरीकांनी चहा दुकांनातील गॅस टॉक्या बाजूला केल्यामुळे आणखी स्फोटक बाजुला झाल्याने परीसरातील नागरीकांना दिलासा मिळाला.

यात विराज स्टेशनरी यांचे 25 लाखाहून अधिक, धनवडे पतसंस्थेचे 4 ते 5 लाख, एस.एम.एम कलेक्शन यांचे 10 लाख, पाटील चहा यांचे 1 लाख, चौगुले बुक स्टोअर यांचे 35 लाखाहून अधिक असे एकुण 70 लाख रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परीसरात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT