Kolhapur Accident |
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोरदार धडक दिली. तर ट्रॅव्हल्सलाही पाठीमागून भरधाव वेगाने आलेली ओमनी धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर १५ जण जखमी झाले आहेत. महामार्गावर टोप-संभापूरजवळ हा अपघात झाला. धडक एवढी जोरत होती की ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला.
अपघातानंतर पुणे-बेंगळुरू महामार्गावर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. अपघातात १६ जण जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर आहेत. जखमींवर सिपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीजण किरकोळ जखमी असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बातमी अपडेट होत आहे...