Farmers Loan Waiver  Pudhari
कोल्हापूर

Farmer Loan Waiver List | १०३१ गावांमध्‍ये आज प्रसिद्ध होणार शेतकरी कर्जमुक्‍तीची यादी

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. यादीमध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील १०३१ गावांचा समावेश असून आज शनिवारी (दि.२५) या सर्व गावांमध्‍ये यादी प्रसिद्ध होणार आहे.

राज्‍य शासनाने राज्‍यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्‍यासाठी पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्‍ती योजनेची घोषणा केली. यासाठी प्रत्‍येक जिल्‍ह्यातून थकबाकीदार शेतकर्‍यांची माहिती शासनाने घेतली. यामध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील २९ हजार ४२९ शेतकर्‍यांची माहिती शासनाच्‍या पोर्टलवर भरण्‍यात आली होती. शेतकर्‍यांचे लक्ष यादीकडे होते. अखेर पात्र शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. जिल्‍हा उपनिबंधक कार्यालयात यादी डाऊनलोड करण्‍याचे काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्‍यामुळे माहिती सादर केलेल्‍या २९ हजार ४२९ शेतकर्‍यांपैकी किती शेतकरी योजनेस पात्र ठरले ही माहिती समजू शकली नाही. पात्र लाभार्थ्यांची संख्‍या आज शनिवारी (दि. २५) समजणार आहे.

जिल्‍ह्यातील १०३१ गावांमधील ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा सोसायटी, दूध संस्‍था, बँक आदी ठिकाणी कर्जमाफी योजनेेतील पात्र शेतकर्‍यांची यादी प्रसिधद्ध केली जाणार आहे. यादीमध्‍ये नावाचा समावेश असलेल्‍या शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन त्‍यांच्‍या खात्‍याचे आधार प्रमाणीकरण करून घ्‍यायचे आहे. यानंतर संबधितांच्‍या खात्‍यामध्‍ये कर्जमाफीची रक्‍कम जमा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT