आजरा : साळगाव (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात धोंडिबा हरी व्हळतकर (वय 66) या शेतकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुळेरान येथील गव्याच्या हल्ल्यानंतर लागोपाठ ही घटना घडल्याने तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
व्हळतकर हे संध्याकाळी चार वाजता शेताकडे गेले होते. गव्यापासून उसाच्या संरक्षणासाठी झटका मशिनची बॅटरी लावत असताना अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. उशिरापर्यंत घरी न आल्याने शोधाशोध केली असता ही घटना निदर्शनास आली.