kolhapur | ज्या दुधाने पोट भरले... त्याच दुधाने चिमुकल्या अर्विलचा श्वास थांबला 
कोल्हापूर

kolhapur | ज्या दुधाने पोट भरले... त्याच दुधाने चिमुकल्या अर्विलचा श्वास थांबला

एक महिन्याच्या बाळाच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ११ जुलै २०२६... मालवणकर कुटुंबात अर्विलच्या जन्माने आनंदाचा पाऊस बरसला. गेला महिनाभरापासून अर्विलला पाहण्यासाठी पै पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. त्याच्या बाललीला पाहताना कुटुंबीयांचा दिवस कधी संपायचा ते कळतही नव्हतं; पण १३ ऑगस्ट हा दिवस साऱ्या आनंदावर विरजण घालणारा ठरला. खरं तर दुधाचा घोट नवजात बालकाची भूक भागवतं, पोट भरतं; पण त्याच दुधामुळे अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्या अर्विलचा श्वास कायमचा थांबला.

दूध पाजत असताना दुधाचा थेंब त्याच्या श्वासननलिकेत जाताच त्याचा जीव गुदमरला, उलटी झाली आणि यातच अर्विलचा दुर्दैवी अंत झाला. सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारे अमोल मालवणकर पत्नीसह पुण्यात स्थायिक आहेत. दि. ११ जुलैला मुलगा झाला. घरगुती पद्धतीने बारसे करून बाळाचे नाव अर्विक ठेवले. पुण्यात पती-पत्नी दोघेच राहत असल्यामुळे बाळंतीण व बाळाची काळजी घेण्यासाठी अमोलच्या पत्नी १५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात आल्या होत्या. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास बाळाला दूध पाजताना ठसका लागला. दूध श्वास नलिकेत गेल्याने बाळ बेशुद्ध झाले. नातेवाईकांनी त्याला तत्काळ एका खासगी रुग्णालयात नेले; मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांमध्ये संवादाचा अभाव

इतक्या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य पोलिसांना नसल्याचे दिसून आले. बाळाचा मृतदेह घेऊन तब्बल तीन तास नातेवाईक ताटकळत उभे होते. सीपीआरमधील पोलिसांनी याची वर्दी वेळेत करवीर पोलिसांना दिली नाही. यामुळे शवविच्छेदनासाठीही विलंब झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT