Family Assault | प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलासह कुटुंबास मारहाण File Photo
कोल्हापूर

Family Assault | प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलासह कुटुंबास मारहाण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या कुटुंबास लाथा-बुक्क्या आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. सोमवार, दि. १३ रोजी दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वैजयंती कांबळे, आकांक्षी कांबळे, आनंदी कांबळे, इंद्रजित कांबळे, सूर्यकांत कांबळे (सर्व रा. कांबळे गल्ली, कुरुकली, ता. करवीर) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

फिर्यादी पूजा लखन जाधव (३०, रा. निपाणी, बेळगाव) यांचा भाऊ ओंकारने सूर्यकांत कांबळे यांची मुलगी आदितीशी प्रेमविवाह केला आहे. सोमवारी (दि. १३) दुपारी ओंकार त्याची आई लक्ष्मी, बहीण पूजा आणि विद्यासोबत आदितीच्या घरी गेला होता. यावेळी आदितीच्या कुटुंबातील सदस्यांनी जाधव कुटुंबास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून काठीने मारहाण केली. तसेच पुन्हा गावात यायचे नाही, पुन्हा गावात पाय ठेवल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण वायदंडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT