राहुल मगदूम यांच्या घरातून बनावट तूप साठा जप्त केला.  
कोल्हापूर

Fake Ghee Factory Raid | जयसिंगपुरात बनावट तूपनिर्मिती केंद्रावर छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूरच्या न्यू मेवाड आईस्क्रीम सेंटरवरही कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरातील न्यू मेवाड आईस्क्रीम व जयसिंगपूर येथील बनावट तूप उत्पादन केंद्रावर छापे टाकून अन्न व औषध विभागाच्या पथकाने सुमारे 2 लाख 5 हजार रुपयांचा साठा जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.

शुक्रवारी जयसिंगपुरात राहुल भाऊसो मगदूम यांच्या घरी अन्नसुरक्षा अधिकार्‍यांच्या पथकाने तपासणी केली. यात बनावट व बेकायदेशीर तुपाचे उत्पादन, साठा आणि विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले. अन्नसुरक्षा अधिकारी पी. के. घुगे यांनी कारवाई करत म्हैस व गाय तुपाचे चार नमुने तपासणीसाठी ताब्यात घेत 595 लिटरचा उर्वरित तुपाचा 1.78 लाखांचा साठा जप्त करण्यात आला. कोल्हापुरातील शालिनी पॅलेस जवळील न्यू मेवाड आईस्क्रीमवरही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT