Ambabai Temple | अंबाबाई मंदिरातील प्रकार : तोतया महिला सुरक्षा रक्षकाला अटक 
कोल्हापूर

Ambabai Temple | अंबाबाई मंदिरातील प्रकार : तोतया महिला सुरक्षा रक्षकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षक असल्याचे सांगून भाविकांकडून दर्शनासाठी पैसे उकळणार्‍या तोतया सुरक्षा रक्षक महिलेस जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. शीतल अविनाश पाटील (वय 33, रा. फुलेवाडी, दत्त मंदिर) असे तिचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मंदिरातील सुरक्षा रक्षक विक्रम शिंदे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली.

बुधवारी सायंकाळी मंदिराच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख संदीप साळोखे व विक्रम शिंदे यांनी शीतल पाटील या महिलेस ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेची खातरजमा करत शीतल पाटील हिला अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी रोख 910 रुपये जप्त केले. अधिक तपास हवालदार संदीप कापसे करत आहेत.

सीसीटीव्हीची होणार तपासणी

पैसे घेऊन भाविकांना सोडण्यामध्ये पाटीलसोबत सुरक्षा व्यवस्थेमधील अन्य कोणी सहभागी आहे का, याची सीसीटीव्ही तपासणी करून त्याची चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT