Ambabai temple | अंबाबाई मंदिरातील शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ येणार 
कोल्हापूर

Ambabai temple | अंबाबाई मंदिरातील शिलालेखांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ येणार

पुरातत्त्व विभागाच्या वतीने पाठवले पत्र

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या संवर्धन आणि जतन कामादरम्यान काही प्राचीन शिलालेख नव्याने उघडकीस आले आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या पुणे विभागीय कार्यालयाने चेन्नई येथील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एपिग्राफी शाखा) उपअधीक्षक शिलालेख तज्ज्ञांना याबाबत पत्र पाठवले आहे.

अंबाबाई मंदिरात सध्या सुरू असलेल्या साफसफाई आणि संवर्धन प्रक्रियेदरम्यान पूर्वी झाकले गेलेले किंवा लपलेले काही शिलालेख समोर आले आहेत. या शिलालेखांचे ‘एस्टॅम्पेज’ (प्रतिमा नोंद) तयार करून त्याचे शास्त्रीय वाचन, अर्थ लावणे आणि दस्तऐवजीकरण करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी चेन्नई येथील एपिग्राफी शाखेतील तज्ज्ञ अधिकारी, कर्मचार्‍यांना लवकरात लवकर कोल्हापुरात पाठविण्याची विनंती केली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या इतिहासाबाबत तसेच तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भांबाबत महत्त्वपूर्ण माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिलालेख अभ्यासाचे महत्त्व

* मंदिराच्या स्थापत्य आणि इतिहासाची नवी माहिती समोर येणार

* तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीवर प्रकाश पडण्याची शक्यता

* शिलालेखांचे वैज्ञानिक पद्धतीने दस्तऐवजीकरण होणार

* भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे तज्ज्ञ करणार अभ्यास

* अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पातील संवर्धन कामांदरम्यान शिलालेख सापडले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT