Ganja Smuggler Arrest | फिरून गांजाची तस्करी करणाऱ्या सराईताला अटक 
कोल्हापूर

Ganja Smuggler Arrest | फिरून गांजाची तस्करी करणाऱ्या सराईताला अटक

पाचगाव येथून तस्करीची कबुली; पोलिस कोठडी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह उपनगरामध्ये चालत फिरून गांजा पुड्यांची विक्री करणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत येथील सराईताला लक्ष्मीपुरी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. अवघूत पिराजी गजगेश्वर (वय २३, गुंजुटे कॉलनी, सोल्जर ग्रुपजवळ, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. संशयिताकडून ४६ हजार रुपये किमतीचा १ किलो ८५० ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला.

अवधूत गजगेश्वरला यापूर्वीही गांजा तस्करीप्रकरणी अटक झाली होती. त्याच्यावर गर्दी, मारामारीचेही गुन्हे दाखल आहेत. चौकशीत पाचगाव (ता.करवीर) येथील त्याच्या मित्राकडून गांजा आणल्याची त्याने कबुली दिली आहे. संबंधितांचे नावही निष्पन्न झाल्याचे पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांनी सांगितले. न्यायालयाने संशयिताला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. चौकशीत निष्पन्न होणाऱ्या संशयितावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT