गौतम गायकवाड 
कोल्हापूर

Two-wheeler accident | दुचाकी अपघातातील जखमी माजी नगरसेवक पुत्राचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : भरधाव स्पोर्टस् बाईकने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले गौतम गायकवाड (वय 40, रा. रमणमळा परिसर) यांचा शनिवारी पहाटे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. माजी नगरसेवक राजाराम गायकवाड यांचे ते चिरंजीव होत. मेरी वेदर मैदानासमोर शुक्रवारी झालेल्या अपघातात गौतम व त्यांची पत्नी सारिका गायकवाड (वय 35) गंभीर जखमी झाले होते.

डोक्याला इजा झाल्याने गौतम यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. बँकेतील कामासह नातेवाईकांना भेटून गौतम पत्नीसह मोपेडवरून ताराबाई पार्क येथून सेंट झेविअर्स स्कूलच्या पिछाडीस रस्त्याने रमण मळ्याकडे जात होते. स्कूलच्या कोपर्‍यावर रस्ता ओलांडत असतानाच कसबा बावडा मार्गावरून आलेल्या स्पोर्टस् बाईकने त्यांच्या मोपेडला जोरात धडक दिली. त्यात गौतम डोक्यावर आदळल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. रमणमळा परिसरातील तरुणांनी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT