Ethanol-Blended Petrol | तिहेरी तोटा होत असल्याची वाहनधारकांची तक्रार रास्त 
कोल्हापूर

Ethanol-Blended Petrol | तिहेरी तोटा होत असल्याची वाहनधारकांची तक्रार रास्त

पेट्रोलच्या भावात इथेनॉल मारले जातेय गळ्यात; इथेनॉलमिश्रित पेट्रोलचे दर मिश्रणाच्या प्रमाणात कमी करणे शक्य

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रीत पेट्रोल भरल्यामुळे तिहेरी तोटा होत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे आणि त्यात काहीसे तथ्यही आहे. त्यामुळे याबाबतीत उच्च पातळीवरून इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचे दर कमी करण्याबाबत ग्राहकाभिमुख निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

इथेनॉलमिश्रीत पेट्रोल वापरल्यामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याची कबुली खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच दिलेली आहे. याचा अर्थ हे पेट्रोल ग्राहकांच्या दृष्टीने नुकसानकारकच ठरते. राज्यभरातील वाहनधारकांच्या इथेनॉलमिश्रीत पेट्रोलबाबत आणि या पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांमध्ये वारंवार होणाऱ्या बिघाडाबाबत वाहनधारकांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत, यातही तथ्य आहे. राज्यभरातील जे स्थानिक मोटार मेकॅनिक आहेत, त्यांच्या मतानुसारही इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचा वापर सुरू झाल्यापासून वाहनांच्या बिघडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणजे एकीकडे या पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी होणार आणि दुसरीकडे वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढून त्याच्या दुरुस्ती खर्चाचा बोजाही पुन्हा वाहनधारकांवरच पडणार!

इथेनॉलमिश्रित पेट्रोलचा वाहनधारकांना होतोय चहुबाजूंनी तोटा

१. सध्या देशात आणि राज्यात उसाचा रस, साखर, मळी, मका, तांदूळ आणि खराब धान्यापासून इथेनॉल बनविण्यात येते. एकतर नेहमीपेक्षा कमी दर्जाचे इंधन वापरायचे ते वापरायचे, दुसरीकडे या खराब इंधनामुळे वाहने कमी मायलेज देणार तो तोटा सोसायचा.

२. या पेट्रोलमुळे वाहनांचे जे नुकसान होणार तेही सोसायचे व उच्च दर्जाच्या पेट्रोलची किंमत मोजून खराब दर्जाचे किंवा कमी गुणवत्तेचे पेट्रोल वापरून खिशाला झळ बसवायची. इथेनॉलमिश्रीत पेट्रोल वापरल्यामुळे असा चहुबाजूनी तोटा होत आहे.

हेदेखील महत्त्वाचे

उसाचा रस व साखरेपासून बनवलेल्या इथेनॉलचा प्रतिलिटर दर ६५.६१ रुपये

मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या इथेनॉलचा दर आहे ७१.८६ रुपये

सर्व प्रकारच्या इथेनॉलचा दर सरासरी प्रतिलिटर ६३.४१ रुपये

तर राज्यात पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ११२ रुपयांच्या घरात आहेत

या हिशेबाने २०० मि. लि. इथेनॉलचे होतात १२ रुपये ६८ पैसे

तर ८०० मि. लि. पेट्रोलचे होतात ८९ रुपये ६ पैसे

त्यामुळे इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचा दर १०२ रुपये २५ पैसे असायला हवा

फार फार तर १०३ रुपये इतका दर असायला हवा

मात्र, आज इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचा भाव आहे ११२ रुपये प्रतिलिटर

म्हणजे इथेनॉलमिश्रीत पेट्रोल वापरणाऱ्यांना ९ ते १० रुपयांचा भुर्दंड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT